Hero Banner
about-thumb
प्राधान्य जनसेवेला, प्रभागाच्या विकासाला..!

सस्नेह नमस्कार..!

मी डॉ. अजय दुधाणे, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 12 (छत्रपती शिवाजी नगर – मॉडेल कॉलनी परिसर) येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार मा. श्री. सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. भाजप एनजीओ आघाडी शहराध्यक्ष, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत. तसेच ‘आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रा’च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे समाजातील युवक व व्यसनाधीन नागरिकांना व्यसनमुक्तीच्या दिशेने नेण्याचे कार्य माझ्या सामाजिक जीवनाचे प्रमुख ध्येय आहे.
माझा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असून मॉडर्न हायस्कूल व फर्ग्युसन कॉलेज येथे शिक्षण घेत असतानाच जीवनातील संघर्षांनी मला समाजाशी जोडले. स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेणे व त्यावर उपाय शोधणे यातूनच माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. आजपर्यंत महिलांसाठी, युवकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मला कायम प्रेरणा देत आला आहे. विशेषतः गेल्या 15 वर्षांपासून 31 डिसेंबर रोजी “दारू नको… दूध प्या” हा उपक्रम यशस्वीपणे राबवत असून त्याचे अनुकरण अनेक ठिकाणी होत आहे.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात देश व राज्य प्रगतीपथावर असून, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात आमदार मा. श्री. सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली लक्षणीय विकास झाला आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन यांसारख्या दैनंदिन प्रश्नांवर सातत्याने काम करत, आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनसेवेचे हे व्रत पुढे नेण्याचा माझा मानस आहे. आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर व सुविधायुक्त व्हावा, हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.


counter-icon

10

+

वर्षे राजकीय सेवा

counter-icon

100

+

आयोजित कार्यक्रम

counter-icon

150

+

राबवलेले उपक्रम

counter-icon

200

+

विविध विकास कामे

अहवाल कामाचा

01

भव्य रक्तदान शिबिर

समाजातील रुग्णांच्या जीवनरक्षणासाठी नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून आयोजित भव्य रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले.

02

मतदार कार्ड व आधार कार्ड सुधारणा कार्यालय

मतदार कार्ड व आधार कार्डमधील नाव, पत्ता व इतर तपशील दुरुस्तीसाठी मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देणारे सेवा केंद्र.

03

आरोग्य शिबिर

नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन देणारे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येते.

04

वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनासाठी व हरित प्रभागाच्या दिशेने नागरिकांच्या सहभागातून वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येतो.

05

शौचालय दुरुस्तीची कामे

नागरिकांच्या स्वच्छता व आरोग्यासाठी सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व देखभाल करून सुविधा सुधारण्याचे काम केले जाते.

बातम्या

बातम्या

कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी आम्हाला कॉल करा

+91 9139390808